प.पू. भक्तराज महाराजांचा परिचय


आमचे प्रेरणा स्थान

4th Slide

प.पू. भक्तराज महाराज


सद्गुरु सेवा मंडळ हि NON PROFIT संस्था असून याची स्थापना १४ ऑगस्ट २०१३ या दिवशी प . पू . नंदू दादा यांच्या अध्यक्षतेखाली धर्मादाय आयुक्त ,जळगाव येथील सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था नोंदणी कार्यालयात नोंदवण्यात आली

सद्गुरू सेवा मंडळाचे कार्यालय जळगाव येथे आहे ,मंडळाची कार्य क्षमता संपूर्ण भारतभर असून सद्या अकोला,जालना,धुळे,पुणे,खामगाव, चाळीसगाव,सोलापूर, ठाणे,मलकापूर याठिकाणी सेवाकार्य सुरू आहे . या मंडळांतर्गत अनेक सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक ,वेगवेगळे उपक्रम शहरांमध्ये तसेच गरजू वस्त्यांमध्ये सुरू आहेत.

सद्गुरू भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादाने व प.पू . नंदू दादा यांच्या प्रेरणेने त्यांनी योजिलेल्या कार्य पूर्ती साठी सद्गुरुसेवा मंडळाची स्थापन करण्यात आली

हि संस्था प.पू . भक्तराज महाराज यांच्या कार्या साठी समर्पित असून पुढील उद्धिष्ट पूर्ती साठी कार्यरत आहे

  • भजन - भक्ती
  • भोजन- तृप्ती
  • भ्रमण -युक्ती


  • ह्या प.पू . भक्तराज महाराजांच्या त्रिसूत्री वरून प्रेरणा घेऊन संस्थे चे कार्य सुरु आहे



    4th Slide
    • भजन

    भजन हे तर बाबांचे सर्वात आवडीचे विश्रांती स्थान.बाबा म्हणजेच भजन व भजन म्हणजेच बाबा. भजन हीच साधना. चैतन्याशी एकरूप होण्यासाठी भजन एक माध्यम आहे. प.पू. भक्तराज महाराजांनी स्वरचित केलेली भजन 'भजनामृत 'ह्या भजनांच्या पुस्तकात आहेत.

    4th Slide
    • भ्रमण

    प. पू. भक्तराज महाराज अखंड भ्रमण करीत असत या भ्रमणा मागचा उद्देश हाच की ,शिष्याची प्रगती व्हायला हवी असेल तर गुरू-शिष्य संपर्क असायला हवा . शिष्यांना सांसारिक अडचणींमुळे ते प. पू. बाबांपर्यंत जाऊ शकत नव्हते मग स्वतः बाबा त्यांच्यापर्यंत जात असत जेणेकरून तेथील भक्तांना आपोआप गुरुदर्शन ,गुरुसहवास व गुरुसेवेच लाभ मिळत असे.

    4th Slide
    • भंडारा/ भोजन

    अन्न दान हें एक श्रेष्ट दान असल्याने बाबांनी आतापर्यंत हजारो ठिकाणी अन्नदान केलेय व अवितरीत सुरू आहे.



    मंडळाचे उद्दिष्टे आणि ध्येय





    • सामाजिक सेवा प्रकल्प
    • शैक्षणिक सेवा प्रकल्प
    • वैद्यकीय (आरोग्य ) सेवा प्रकल्प
    • धार्मिक सेवा कार्य
    • अन्नदान व पोषक आहार वाटप प्रकल्प
    • कपडे वाटप सेवा प्रकल्प
    • पर्यावरण रक्षणार्थ वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन प्रकल्प

    • समाज्याच्या सेवेद्वारे सुदृढ समाज / सुसंस्कारी समाज व विद्यार्थी घडवणे

    • पर्यावररक्षण व वृक्षारोपण ,वृक्षसंवर्धन जागृती

    • जनजागृती द्वारे समजा मध्ये राष्ट्रभक्ती व समाजसेवा भावना वाढावी यासाठी प्रयत्न



    Copyright © Satguru Seva Mandal
    Designed By Pawgi Infotech Services